वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

February 11, 2010 9:50 AM0 commentsViews: 3

11 फेब्रुवारीचंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील कवडशी इथे पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वाघाने हल्ला करून लक्ष्मण लांड या व्यक्तीला ठार केले. चिमूर वनविभागातल्या खडसंगी रेंजमध्ये ही घटना घडली आहे. ताडोबा वनक्षेत्रातील सिंदेवाही इथली घटना ताजी असतानाच हा प्रकार घडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार झाल्याची ही चौथा घटना आहे. हा वाघ पकडण्यासाठी आता पिंजरा लावण्यात आला आहे.

close