पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकाचा जाळून घेण्याचा प्रयत्न

November 26, 2015 6:23 PM0 commentsViews:

pune office426 नोव्हेंबर : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका व्यक्तीने पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना घडलीये.रुबेन सॅम्युअल मॅन्युअल असं या व्यक्तीचं नाव आहे.

पोलीस विभागाकडून रुबेनला तडीपार करण्याची नोटीस देण्यात आली होती. तडीपार कारवाई विरोधात रुबेनने पोलीस विभागाकडे आक्षेप नोंदविला होता. मात्र पोलीस विभाग दाद देत नसल्याने स्वतःला पेटवून घेतलं. रुबेन हा 50 टक्के भाजलाय त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रुबेनवर खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. रुबेन हा पत्रकार असून त्याचा पुण्यात स्वत:चं लाईट ऑफ पुणे नावाचं वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राचा तो संपादक आहे.

या पदाचा दुरुपयोग करुन तो लोकांकडून खंडणी वसूल करायचा अशा तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. या तक्रारींमुळेच त्याच्याविरोधात पुणे पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली होती. या नोटीसीच्या दहशतीमुळे तो तडीपारी रद्द करण्यासाठी वारंवार पुणे पोलिसांकडे जात होता. शेवटी त्यात दाद मिळाली नाही म्हणून सगळ्यांचं लक्ष वेधुन घेण्यासाठी स्वत:ला पेटवून घेण्याचा स्टंट केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close