शिवसेनेला विरोध

February 11, 2010 11:07 AM0 commentsViews: 6

11 फेब्रुवारीशाहरुख खानच्या माय नेम इज खान या सिनेमाच्या विरोधात रान उठवणार्‍या शिवसेनेला आता विरोध होऊ लागला आहे. मुंबईत सेनाभवनासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी सेनेच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. अवामी भारत संघटनेने या आंदोलनासाठी पुढाकार घेतला आहे. यात सामाजिक कार्यकर्ते फोरोज मिठीबोरवाला, तिस्ता सेटलवाड आदी सहभागी झाले आहेत. आंदोलक आणि शिवसैनिक यांच्यात यावेळी जोरदार झटापट झाली.

close