नागपूर टेस्टमध्ये भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर 310 धावाचं टार्गेट

November 26, 2015 8:47 PM0 commentsViews:

Ravichandran Ashwin26 नोव्हेंबर : नागपूर टेस्टमध्ये टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 310 रन्स टार्गेट ठेवलंय. दुसर्‍या दिवशीचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 2 विकेट्स गमावत 32 धावा केल्या होत्या. विजयासाठी त्यांना 278 रन्सची गरज आहे.

दुसर्‍या डावात टीम इंडिया 173 रन्सवर ऑल आऊट झाली. शिखर धवननं सर्वाधिक 39 रन्स केले. तर चेतेश्वर पुजारानं 31 रन्स केले. दक्षिण आफ्रिकेकडून इम्रान ताहीरनं 5 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, नागपूरच्या खेळपट्टीवर आज एका दिवसात 20 विकेट्स गेल्यात. त्यामुळे या खेळपट्टीवर जोरदार टीका होतेय. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळासाठी यजमानांसाठी इतकी अनुकूल असलेली खेळपट्टी ठेवावी का, असा प्रश्न विचारला जातोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close