अक्षयच्या ‘एअरलिफ्ट’ची झलक

November 26, 2015 8:51 PM0 commentsViews:

अक्षय कुमारचा बहु-प्रतिक्षित ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. हा एक थ्रीलर सिनेमा असून सिनेमाचं कथानक एका सत्यघटनेवर आधारीत असणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन राजा कृष्ण मेनन यांनी केलं आहे. चित्रपटात अक्षयसोबत ‘द लंचबॉक्स’ फेम निम्रता कौर ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षय त्याच्या कॅमर्शियल सिनेमांसोबतच ऑफ बीट सिनेमांसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. आजवर त्याने बेबी, स्पेशल 26, हॉलीडे यासारखे अनेक ऑफ बीट चित्रपट केले. पण ‘एअरलिफ्ट’ ची मात्र प्रेक्षकांमध्ये जास्तच क्रेझ दिसून येतेय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close