कोटलावरची बंदी कायम

February 11, 2010 11:17 AM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारीदिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर घालण्यात आलेली एका वर्षाची बंदी आयसीसीने कायम केली आहे. या बंदीविरुद्ध बीसीसीआयने केलेले अपिलही आयसीसीने फेटाळले आहे. बीसीसीआयसाठी ही मोठी नामुष्की ठरली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या श्रीलंका वन डे सिरीजदरम्यान या मैदानावर बंदी घालण्यात आली होती. या पिचवर उसळणार्‍या बॉलमुळे श्रीलंकेचे बॅटस्‌मन जखमीही झाले होते. त्यामुळे ती मॅचही रद्द करण्यात आली होती. आता या निर्णयामुळे येत्या डिसेंबर 2010 पर्यंत या पिचवर आयपीएल आणि चॅम्पियन्स लिग 20 – 20 स्पर्धा वगळता कोणतीही आंतरराष्ट्रीय मॅच खेळवता येणार नाही.

close