शीनाच्या नावे हॉगकाँगमध्ये खाते, पीटर-इंद्राणीने 900 कोटी वळवले ?

November 27, 2015 3:27 PM0 commentsViews:

sheena peter27 नोव्हेंबर : शीना बोरा हत्या प्रकरणी पीटरच्या सीबीआय कोठडीत 30 तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शीना बोराच्या नावाने हॉगकाँगच्या HSBC बँकेत खातं आहे, असा धक्कादायक खुलासा सीबीआयनं कोर्टात केला आहे.

तर शीनाची हत्या आर्थिक कारणावरून झाली असल्याची शक्यता सीबीआयनं वर्तवलीये. 9 कंपन्यांकडून मिळालेला पैसा पीटरनं एका चॅनलमध्ये गुंतवला होता. ही रक्कम 900 कोटींच्या घरात असल्याचा सीबीआयचा प्राथमिक अंदाज आहे. यातली बरीचशी रक्कम शीनाच्या खात्यात वळती करण्यात आल्याची माहिती मिळतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close