जीएसटी विधेयकासाठी पंतप्रधान मोदींचं सोनियांना निमंत्रण !

November 27, 2015 3:38 PM0 commentsViews:

modi_sonia_manmohan_singh27 नोव्हेंबर : जीएसटी विधेयकाचा तिढा अजून सुटलेली नाही. याबाबत आता पंतप्रधान मोदींनी स्वतः पुढाकार घेतला असून सोनिया, राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. आज संध्याकाळी सात वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

याआधी खुद्द जेटली यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती, आणि काँग्रेसकडून पाठिंब्याचं आश्वासन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण, राहुल यांनी कोणतंही आश्वासन न दिल्यामुळे आता मोदींनी याबाबत पुढाकार घेतलाय. पंतप्रधान मोदींनी सोनियांना फोन केला होता.

पण आता यावरच राहुल गांधींनी टीका केलीये. पंतप्रधानांनी स्वत:च्या स्वभावाविरोधात जाऊन आम्हाला फोन केला तो सार्वजनिक दबावामुळेच अशी टीका राहुल यांनी केली. तसंच आम्हीच जीएसटी विधेयक आणलं आहे, असा दावाही त्यांनी केलाय.

निमंत्रणाची कशी फिरली चक्र ?

- राष्ट्रपती भवनातल्या एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग यांची भेट झाली
– मोदींनी जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला
– मी गांधी परिवाराशी बोलतो, असं आश्वासन सिंग यांनी मोदींना दिलं
– सोनिया आणि राहुल यांनी निमंत्रण स्वीकारलं

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close