भारत-पाकिस्तान सीरिजचा निर्णय नाही !

November 27, 2015 4:46 PM0 commentsViews:

ind vs pak27 नोव्हेंबर : भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट सीरिजबद्दल अजून निर्णय झालेला नाही, असं गुरुवारी उशिरा रात्री परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय.

दोन्ही देशांमध्ये डिसेंबर महिन्यात श्रीलंकेत सामने होतील, अशी बातमी 2 दिवसांपूर्वी आली होती. आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनीच ही माहिती दिली होती, पण आता तसं नाहीय.

केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळेपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये सामने होणार नाहीत. बीसीसीआय ही जरी खासगी संस्था असली, तरी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामने खेळवायचे की नाही, यावर अंतिम शब्द केंद्र सरकारचाच असतो.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close