मोदींकडून निमंत्रण लोकांच्या दबावामुळेच -राहुल गांधी

November 27, 2015 5:00 PM0 commentsViews:

28 नोव्हेंबर : जीएसटी विधेयकावर सर्वसहमती करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना चर्चेचं निमंत्रण दिलंय. पण, आता यावरच राहुल गांधींनी टीका केलीये. पंतप्रधानांनी स्वत:च्या स्वभावाविरोधात जाऊन आम्हाला फोन केला तो सार्वजनिक दबावामुळेच अशी टीका राहुल गांधींनी केली.4547Rahul_Gandhi

तसंच मोदींच्या मनात असं काहीही नाही. ते एक बिझनेसमॅन आहे. त्यानुसारचे ते वागताय असा टोलाही राहुल गांधींनी लगावला. मुळात आम्हीच जीएसटी विधेयक आणलं आहे. आम्हालाही जीएसटी विधेयक पास व्हावे अशी आशा आहे. पण भाजप सरकारच्या काही निर्णयावर आमचे मतभेद आहे असंही राहुल यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close