चंदूकाका ज्वेलर्सला ‘स्पेशल 26′ स्टाईल लुटलं, 100 तोळे सोनं लंपास

November 27, 2015 6:13 PM0 commentsViews:

PUNE CHANDUKAKA 3427 नोव्हेंबर : अहमदनगरमधल्या चंदूकाका ज्वेलर्सला एका भामटयाने तब्बल 100 तोळे सोन्याला गंडा घातलाय. पुण्यातल्या स्टीवनदास गॉडवीन या नावाच्या व्यक्तीने ‘स्पेशल 26′ सिनेमा स्टाईलने ही चोरी केलीय.

या गॉडवीननं 1-1 तोळ्याचे 100 गोल्ड कॉईन्सची ऑर्डर दिली. या ऑर्डरची डिलिव्हरी पुण्यातल्या इऑन आयटी पार्कमध्ये मागितली. पण विशेष म्हणजे या आयटी पार्कमधल्या ज्या कंपनीत ही डिलिव्हरी मागण्यात आली ती गॉडवीनची नव्हतीच. या गॉडवीनने त्या जागेच्या
मालकाला आपल्याला ही जागा भाड्याने घ्यायची आहे, असं सांगून जागा तासभरात बघून तुम्हाला कळवतो, असं सांगितलं. आणि या तासाभराच्या वेळेतच गोल्ड कॉईनची डिलिव्हरी मागितली. डिलिव्हरी बॉय जेव्हा कॉईन घेऊन आला तेव्हा तुम्ही इंथेच थांबा, मी हे क्वाईन खाली लॉकरमध्ये ठेवून येतो आणि पैसे बँकेत ट्रान्सफर करतो असं सांगितलं आणि तिथून पसार झाला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close