लष्करात भ्रष्टाचार

February 11, 2010 11:30 AM0 commentsViews: 2

11 फेब्रुवारीमटेरिअल सप्लायरशी संगनमत करून लष्करातच भ्रष्टाचार करणार्‍या आर्मीच्या तिघांना पुण्यात सीबीआयने अटक केली आहे. आर्मीतील 'क्वालिटी कंट्रोल'मध्ये काम करणार्‍या ए. जे. पवार, ए. प्रभाकरन आणि फयाजऊदीन यांना या प्रकरणी अटक झाली आहे.या तिघांनीही सुनील शर्मा या सप्लायरशी संगनमत करून लष्काराच्या वाहनांना निकृष्ठ दर्जाच्या चेन्सचा पुरवठा केलाय. बर्फात चालणार्‍या लष्कराच्या गाड्यांना विशिष्ट पद्धतीच्या चेन्स आवश्यक असतात. अशा नित्कृष्ठ दर्जाच्या चेन्सचा पुरवठा झाल्याचे उघडकीस आले होते. आत्तापर्यंत सुमारे दीड कोटींच्या अडीच हजार नित्कृष्ठ चेन्सचा पुरवठा करण्यात आला आहे. अखेर तीन वर्षांनंतर या आरोपींना अटक करण्यात सीबीआयला यश आले आहे.

close