मेट्रोचा प्रवास महागला, तिकीट आणि पासच्या दरात वाढ

November 27, 2015 8:15 PM0 commentsViews:

mumbia-metro111127 नोव्हेंबर : मुंबईकरांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. कारण मुंबई मेट्रोने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. मासिक पास आणि किमान तिकिटांच्या दरात वाढ करण्यात आलीये. आता किमान तिकिटांच्या दरात 5 रुपये वाढ करण्यात आलीये. तर मासिक पासच्या दरात सरासरी 50 रुपयांची वाढ करण्यात आलीये. हे दर 1 डिसेंबरपासून लागू होणार आहेत.

मुंबई मेट्रोला भाडेवाढ करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दिल्यानंतर अखेर मेट्रोने महागाईचे तिकिट कापले आहे. मेट्रोने घसघशीत 5 रुपयांची भाडेवाढ केली आहे. मासिक पासमध्ये 50 रुपयांची वाढ केलीये. या भाडेवाढीमुळे आता ज्यांचा मासिक पास 675 रुपयांचा आहे त्यांना आता 725 रु पये मोजावे लागणार आहे. जर तुमचा पास जर 900 रुपये असेल तर तुम्हाला 950 रूपये मोजावे लागणार आहे. जास्तीत जास्त तिकिट 40 वरुन 45 रुपये होणार आहे. आधी 10, 20, 30 आणि 40 असे दर होते ते आता 10, 20, 25, 35 आणि 45 होणार आहे. शॉर्ट ट्रीप आणि लाँगट्रीपमध्ये दर प्रवासामागे 1 रुपयाने वाढ केलीये. त्यामुळे मेट्रोच्या गारेगार प्रवासासाठी आता आणखी पैसे मोजावे लागणार आहे आता स्पष्ट झालंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close