माय नेम इज…लांबणीवर

February 11, 2010 11:44 AM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारीअखेर माय नेम इज खान हा सिनेमा उद्या रिलीज होणार नाही. थिएटर मालकांच्या संघटनेने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी क्रिकेटर्सविषयी वक्तव्य करणार्‍या शाहरुख खानला विरोध करण्यासाठी शिवसेनेने या सिनेमाला गेले काही दिवस जोरदार विरोध सुरू केला होता. शिवसैनिकांनी मुंबई आणि राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 'राडा' सुरू केला होता. दरम्यान सेनेच्या आंदोलनाला धूप घालणार नाही. थिएटर्सना पूर्ण सुरक्षा दिली जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारने दिली होती. तरीही शिवसैनिकांच्या हिंसक आंदोलनामुळे थिएटर मालक धास्तावले होते. त्यामुळेच कोणत्याही प्रकारची 'रिस्क' टाळण्यासाठी सिनेमा रिलीज करण्याची तारीख संघटनेने पुढे ढकलली आहे.

close