पंतप्रधान मोदी, सोनिया गांधी भेटले ; जीएसटी विधेयकावर झाली चर्चा

November 27, 2015 9:32 PM0 commentsViews:

pm modi meet sonia gandhi27 नोव्हेंबर : जीएसटी विधेयकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. अखेर ही बैठक संपली असून या बैठकीत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. जीएसटी विधेयकावर दोन्ही पक्षामध्ये आणखी चर्चा होऊ शकते अशी माहिती अरुण जेटली यांनी दिली.

संसदेचं हिवाळी अधिवेशन कालपासून सुरू झालंय. या अधिवेशनात सरकारची खरी कसोटी लागणार आहे ती, जीसएसटी विधेयक संमत घेण्यावरुनच…कारण लोकसभेत जरी सरकारकडे बहुमत असलं तरी, राज्यसभेत मात्र सरकार अल्पमतात आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या काही नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रण दिलं होतं.

त्या बैठकीला सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पक्षातले इतर काही ज्येष्ठ नेते हजर होते. काँग्रेसनं जीएसटीबाबत आपली भूमिका या बैठकीत स्पष्ट केली. याच मुद्यावरुन पुन्हा काँग्रेस नेत्यांशी चर्चा होऊ शकते, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय. परंतु, या बैठकीच्या निमित्ताने एकमेकांवर टीका करणारे दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र दिसले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close