अरुंधती रॉय यांना महात्मा फुले पुरस्कार प्रदान सोहळ्यात अभाविपचा गोंधळ

November 28, 2015 1:13 PM0 commentsViews:

abvp arundhati roy28 नोव्हेंबर : सामाजिक कार्यकर्ता अरुंधती रॉय यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. फुले वाड्यात झालेल्या या कार्यक्रमात माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान अभाविप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला.

पोलिसांनी हस्तक्षेप करत या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. अरुधंती रॉय यांनी देशविरोधी वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या पुरस्काराला अभाविप कार्यकर्त्यांनी विरोध केला होता.

दरम्यान, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची अनुपस्थिती होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close