भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसालाच जमावाकडून मारहाण

November 28, 2015 3:33 PM0 commentsViews:

28 नोव्हेंबर : मुंबईतील दादर फुल मार्केटमध्ये एक भांडण सोडवायला गेलेल्या एका पोलिसालाच लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. गुरूवारी रात्री ही घटना घडली होती. दादर फुल मार्केटमध्ये नेहमी वर्दळ असते.

dadar policeदोन गटामध्ये भांडण सुरू असल्याचं पाहुन पोलीस ते सोडवायला गेले असता संतप्त नागरिकांनी पोलिसांनाच चोप दिला. त्यामुळं पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. आणखी तपास सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close