जीएसटी विधेयकाला तत्त्वत: पाठिंबा देण्यास सोनिया गांधी तयार -नायडू

November 28, 2015 1:40 PM0 commentsViews:

modi_&_sonia_meet (1)28 नोव्हेंबर : जीएसटी विधेयकाला सोनिया गांधी तत्त्वत: पाठिंबा देतील अशी माहिती भाजपचे नेते व्यंकया नायडू यांनी दिली. कालच्या बैठकीत सोनियांनी या विधेयकात काही बदलही सुचवले असून, आमची चर्चा अतिशय सकारात्मक राहिलीय. आम्ही हे विधेयक नक्कीच मंजूर करू शकू अशा आशावादही नायडूंनी व्यक्त केलाय.

काल पंतप्रधान आणि सोनियांची याच मुद्यावर सविस्तर चर्चाही झाली असंही नायडू म्हणाले. काल शुक्रवारी संध्याकाळी जीएसटी विधेयकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक संपली. या बैठकीत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. जीएसटी विधेयकावर दोन्ही पक्षामध्ये आणखी चर्चा होऊ शकते अशी माहिती अरुण जेटली यांनी दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close