पीटर मुखर्जीची होणार लाय डिटेक्टर चाचणी

November 28, 2015 5:06 PM0 commentsViews:

peter mukherji28 नोव्हेंबर : शीना बोरा हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या पीटर मुखर्जीची आता लाय डिटेक्टर चाचणी होणार आहे. विशेष न्यायालयाने सीबीआयला या लाय डिटेक्टर चाचणीची परवानगी दिली आहे.

पीटरची आजही सीबीआयने तब्बल सहा तास चौकशी केली. पीटरच्या मीडिया हाऊसमधून मिळालेले पैसे पीटर आणि इंद्राणी यांनी शीनाच्या परदेशातल्या बँक खात्यात वळते केले का आणि त्यावरूनच शीना आणि इंद्राणीचे वाद होते का, या दिशेने सीबीआयचा तपास सुरू आहे. यासंदर्भातच आज पीटरची चौकशी करण्यात आली.

पण हत्येमागे हेच एकमेव कारण असेल असं नाही, तर इतर कुठलंही कारण असू शकतं आणि त्याचाही तपास सुरू असल्याचं सीबीआय अधिकार्‍यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close