वाईन उद्योगावर संकट

February 11, 2010 1:27 PM0 commentsViews: 30

- सिद्धार्थ गोदाम वाईनला बाजारात उठाव नसल्याने महाराष्ट्राचा वाईन उद्योग अडचणीत सापडला आहे. मागच्या वर्षीची 1 कोटी लीटर वाईन शिल्लक आहे. त्यामुळे जवळपास 700 कोटींचा व्यवहार ठप्प झाला आहे. वाईन उद्योगाकडून मागणी नसल्याने द्राक्ष बागायतीला त्याचा फटका बसला आहे. राज्यातील 25 हजार एकर द्राक्षबाग वाळण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीचीच वाईन पडून असल्याने यंदाच्या हंगामात द्राक्षांचे क्रशिंग करायला वाईन उद्योग तयार नाही. वाईनची द्राक्षे खाण्यासाठी उपयोगात येत नाहीत की त्यांचे बेदाणेही करता येत नाही. शिवाय मागच्या वर्षीच्या द्राक्षांचा मोबदलाही वाईन कंपन्या शेतकर्‍यांना देऊ शकलेल्या नाहीत. वाईन उद्योग जागतिक मंदी आणि आयटी उद्योगाच्या पडझडीमुळे अडचणीत आला असल्याचे वाईन उद्योजक सांगत आहेत. महाराष्ट्राच्या वाईनला युरोप, अमेरिकेच्या बाजारात मोठी मागणी आहे. पण मंदीमुळे या देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. विक्रीविना पडून असलेल्या वाईनवर 4 टक्के विक्रीकर ठेवला आणि या वाईनपासून स्पिरीट तयार करण्याची परवानगी दिली तर हा उद्योग आणि द्राक्षबागाही वाचतील.

close