विमानतळासाठी सरकारला हवे साईंच्या दानपेटीतून 110 कोटी, नागरिकांचा विरोध

November 28, 2015 7:03 PM0 commentsViews:

shrdi airport28 नोव्हेंबर : साईबाबांच्या दानपेटीत आलेले पैसे विमानतळ विकासासाठी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून आलाय. शिर्डी विमानतळासाठी 110 कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारने साई संस्थानला दिला आहे. शिर्डी मुलभूत सुविधांची वानवा असताना विमानतळासाठी पैसे देण्यास  नागरिकांनी विरोध केला आहे.

शिर्डी विमानतळाचे काम गेल्या पाच वर्षांपासुन सुरू आहे. काम आता पुर्नत्वाकडे आले असताना विमानतळाच्या आणखी विस्तारी करणासाठी साईबाबांच्या तिजोरीतील 110 कोटी रुपये राज्य सरकार मागते आहे. या अगोदरही 50 कोटी रुपये विमानतळासाठी
साईसंस्थानने दिले होते. आता आणखी 110 कोटी रूपयांची मागणी राज्य सरकारने केली आहे. शिर्डीत मात्र मुलभूत सुविधांची वानवा आहे. आलेल्या भक्तांना चालण्यासाठी धड रस्ते नाही, पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे, दर्शन रांग भक्तांसाठी कमी पडते आहे,
शिर्डीत भक्तांना शौचालय आणि मुतारी नाही, कचर्‍याचे ढिग लागलेले आहेत. रूग्णालयाची अवस्था वाईट झाली आहे. शिर्डी बायपास गेल्या दहा वर्षांपासून रखडला आहे. साईबाबा समाधी शताब्दी वर्ष तोंडाशी आलेले असताना शिर्डीतील पायाभूत सुविधा न करता. विमानाने येणार्‍या मुठभर श्रीमंतासाठी राज्य सरकार पायघड्या टाकत असल्याने नागरिकांनी विमानतळासाठी पैसे देण्यास विरोध केला आहे.

राज्य सरकारने प्रस्ताव साईबाबा संस्थानकडे पाठवलेला आहे. त्यावर आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्कामोर्तब
केल्यानंतर राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. मात्र शिर्डीकरांनी विरोध केल्याने आता सरकार काय निर्णय घेणार हा प्रश्न आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close