लोअर परेल स्मार्ट सिटी कशाला ?

November 28, 2015 7:18 PM0 commentsViews:

प्रणाली कापसे, मुंबई

28 नोव्हेंबर : स्मार्ट सिटीवरुन मुंबई पालिकेत राजकारणाला सुरुवात झाली आहे. पालिका लोअर परेल भागाला विशेष क्षेत्र विकसित करणार असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काहींना हा भाग निवडण्यामागे राजकारण दिसतंय. तर काही आपल्या भागावर अन्याय झाल्याची ओरड करत आहेत.

lower parelसध्या देशभरातल्या महानगरांमध्ये चर्चा आहे ती स्मार्ट सिटी प्रकल्पाची…केंद्र सरकारनं देशातल्या शंभर शहरांना प्रतिवर्ष 100 कोटी रुपये देण्याचा निर्णय जाहीर केलाय. या निधीतून त्या महानगपालिकांना आपल्या शहराला स्मार्ट सिटी बनवायचं. मुंबई महानगर पालिकेनं या प्रकल्पातला विशेष भाग म्हणून लोअर परेल या भागाचा विचार सुरू केलाय. या स्पर्धेत लोअर परेल बरोबर नरिमन पाईंट, फोर्ट आणि अंधेरी पश्चिम यांचा ही विचार करण्यात आला होता.त्यात लोअर परेलची निवड झाली कारण,

-लोअर परेल भागात उपनगरातून शहरात येणारी 5 रेल्वे स्थानकं आहेत
– लोअर परेल या भागात रहिवाशी आणि कार्यालयीन अशी दोन्ही प्रकारची लोकवस्ती आहे.
– या भागात सर्वात मोठ्या रहिवाशी आणि कार्यालयीन इमारतींचं बांधकाम सुरू आहे.
– त्यामुळे भविष्यातही या भागात लोकवस्ती वाढणार आहे.

या भागातल्या लोकप्रतिनिधींना मात्र हे एक विशिष्ट पक्षाकडून निवडणुकीपूर्वी लोकांना दाखवलेलं गाजर वाटतंय. लोअर परेल या भागाची निवड झाल्यामुळे इतर भागतल्या नगरसेवक आणि आमदारांना त्यांच्या निवडणूक क्षेत्रावर अन्याय होऊ नये, असं वाटतंय. पालिका जर कमर्शियल हबला विशेष महत्व देत असेल तर दुसरीकडे रहिवाशांच्या सुविधांनासुद्धा तितकच महत्व द्या अशी त्यांची मागणी आहे. शिवाय आमच्या भागाचांही विचार हे विशेष क्षेत्र विकसीत करताना करा अशी मागणी करताहेत.

पालिका प्रशासन स्मार्ट सिटीच्या नावावर स्थानिकांना पळवून लावण्याच्या प्रयत्नात असल्याची शंका शिवसेनेला वाटतेय. तर भाजपला मात्र प्रशासन हे कमर्शियल भागांना झूकत माप देत असल्याचा आरोप करतंय. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी विशेष क्षेत्र घोषित होण्यापूर्वीच राजकारण सुरू झालंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close