गुळ,खोबर्‍याची चटणी आणि गुळभेंडी हुरडा !

November 28, 2015 7:03 PM0 commentsViews:

28 नोव्हेंबर : राज्यात थंडीची चाहूल लागलीय…मराठवाड्यातही थंडी जाणवतेय..आणि त्यामुळेच आता..औरंगाबाद जिल्ह्यात हुरडा पाटर्‌या सुरू झाल्यात….शिवारातली गावरान मेव्यासोबतची ही हुरडा पार्टी कशी रंगते त्याबद्दल सांगतोय सिद्धार्थ गोदाम

hurda partyगंगापूर तालुक्यातील शिवराम शिंदे यांच्या गुळभेंडी हुरड्याच्या शेतात आता अशा आलिशान गाड्या दिसू लागल्यात…याचा अर्थ आहे..हुरडा पार्टीला सुरुवात झाली…शिवराम शिंदे यांच्या शेतात अस्सल पारंपरीक पद्धतीनं गावरान हुरडा मिळतो. त्यामुळेच त्यांच्या
शेतात हुरडा प्रेमींची ही गर्दी…गुळभेंडी हुरड्याची लुसलुसीत कणसं…आणि त्यात दुधाळ हिरवी दाणी..हिच हुरड्याची खासियत आहे.

शेकोटीतून काढलेला गरमागरम हुरडा नुसता खायचा नाही…तर त्याजोडीलाआहे…गावरान गुळ..दही…शेंगादाण्यााची चटणी..खोबर्‍याची चटणी…आणि हे सगळं खायचं तेही हिरव्यागार बोरीच्या झाडाखाली… तर हुरड्‌या सोबतच ताजा हरबरा…आंबट गोड गावरान बोरं..हिरवे जांब…आणि मिठात उकडलेली मक्याची कणसं…तोंडाला पाणी सुटलं ना ?

थांबा कुठे निघला राव…पार्टी अजून संपलेली नाही…आता मजा घ्यायचीय…शेतातील चुलीवरच्या जेवणाची…

जेवणाचा बेतही अगदी गावरानच…चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी …हिरव्या मिरचीचा ठेचा…पिठलं…भरल्या वांग्याची भाजी…चुलीत भाजलेल्या वांग्याचं भरीत…मग चला तर…थंडीही जाणवतेय आणि शेतातील हुरडा पार्टी आपल्याला खुणवतेय…आता उशीर करू नका…लवकरच एकदा तरी शेकटीतला हुरडा चाखाच…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close