‘थिएटरवाल्यांनो धाडस दाखवा’

February 11, 2010 2:52 PM0 commentsViews: 6

11 फेब्रुवारीमाय नेम इज शाहरुख या सिनेमाच्या रिलीजला सुरक्षा देण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. आता थिएटर मालकांनीच धाडस दाखवून हा सिनेमा रिलीज करावा, असे आवाहन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. शिवसेनेच्या आंदोलनांनी धास्तावलेल्या थिएटरमालकांनी उद्या हा सिनेमा रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे. सरकार आणि पोलिसांवर जनतेचा विश्वास नाही, त्यामुळेच सिनेमा रिलीज न करण्याचा निर्णय थिएटर मालकांनी घेतला. हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

close