भारताच्या सिंधूची मकाऊ ओपनमध्ये ‘हॅटट्रिक’

November 29, 2015 2:29 PM0 commentsViews:

sindhu-getty409-630

29  नोव्हेंबर : भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने मकाऊ ओपन ग्रॅण्डप्रिक्स बँडमिंटन स्पर्धेत विजय मिळवला आहे. सिंधूने जपानच्या मिनात्सू मितानीचा पराभव करत सलग तिसर्‍यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावलं आहे.

सिंधू हिने मिनात्सूवर 21-9, 21-23, 21-14 अशी मात करत मकाऊ ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावलं. या स्पर्धेत तिला एक लाख 20 हजार डॉलर पारितोषिक स्वरुपात देण्यात आलं आहे. दरम्यान जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानावर असलेल्या सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात नववी मानांकित जपानची अकाने यामागुची हिचा काल पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close