हवामान बदलाबाबत मोदींनी व्यक्त केली चिंता

November 29, 2015 3:36 PM0 commentsViews:

modi man ki baat

29  नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून हवामान बदलाबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘जागतिक तापमानात होत असलेल्या वाढीकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज असून ऊर्जा संहवर्धन हा त्यावरील उपाय आहे’ असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे. आपल्या 14 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे पंतप्रधांनी इतर अनेक मुद्द्यांना हात घालत देशवासीयांना संबोधित केलं.

देशातील विविध भागात गेल्या काही दिवसांत कमी – जास्त पाऊस झाला असून तामिळनाडूमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नैसर्गिक संकट उद्भवले आहे, असं त्यांनी सांगितलं. तसंच तामिळनाडूत पुरामुळे झालेल्या मनुष्यहानी आणि वित्तहानीचा उल्लेख करत या नैसर्गिक संकटात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारसह, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी मोठी मदत केल्याचंही ते म्हणाले.

त्याचबरोबर ‘सार्क’ देशांनी एकत्र येऊन आपत्ती व्यवस्थापनाची व्यवस्था करण्याची संपल्पना आपण मांडली असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. नैसर्गिक संकटांता सामना करण्यासाठी सार्क देशांनी एकत्र येऊन संयक्त कार्यक्रम आखला पाहिजे असं आपण नेपाळ भूकंपानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सांगितलं असल्याचंही मोदी म्हणाले.

आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात हवामान बदलाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधल्यानंतर पंतप्रधान पॅरिसमधील ‘COP21′ या हवामान बदलावर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक परिषेदत सहभागी होण्यासाठी रवाना झाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close