उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 1 हजार दुष्काळग्रस्तांना मदतीचं वाटप

November 29, 2015 4:41 PM0 commentsViews:

uddhav on MeatBan

29  नोव्हेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौर्‍यावर आले असून, त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा हात दिला. तब्बल 1 हजार शेतकर्‍यांना प्रत्येक 3 शेळ्या आणि 10 हजार रूपयांची मदत उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज सुपूर्द करण्यात आली.

दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाडय़ातील जालना, नांदेड, परभणी या जिल्हय़ातील शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. तसंच शेतकर्‍यांसाठी शिवसेनेच्यावतीने मदतही केली. ठाकरे यांच्या हस्ते 1 हजार दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रत्येकी 3 शेळया आणि 10 हजार रूपयांची मदत करण्यात आली. मदत स्वाकारल्यानंतर प्रत्येक शेतकर्‍याच्या चेहर्‍यावरून समाधानाचे भाव दिसून येत होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एसटीचा पास देता येत नसेल तर सरकार चालविण्यास आम्ही असमर्थ असल्याची बोचरी टीका ठाकरे यांनी या वेळी केली. तसंच शिवसेना दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी ठाम उभी असल्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close