फहीम अन्सारीच्या वकिलाची हत्या

February 11, 2010 3:31 PM0 commentsViews: 3

11 फेब्रुवारी26/ 11 च्या हल्ल्यातील संशयित आरोपी फहीम अन्सारीच्या वकिलाची आज मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ऍडव्होकेट शाहीद आझमी असे या वकिलाचे नाव आहे. गोळीबार झाल्यानंतर आझमी यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. आझमी यांच्या कुर्ल्यातील ऑफिसमध्ये घुसून त्यांच्यावर तीन अज्ञात इसमांनी गोळीबार केला होता. या हत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

close