जिल्हा न्यायालय परिसरात वकिलाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला

November 29, 2015 9:07 PM0 commentsViews:

êËêÖêËÖêy

29  नोव्हेंबर : नागपूरमधली एक धक्कादायक बातमी आहे.नागपूरच्या जिल्हा न्यायालय परिसरात ऍड श्रीकांत खांडलकर मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. श्रीकांत खांडलकर असं त्यांचं नाव आहे.

जिल्हा न्यायालय परिसरातील दगडी बिल्डिंगमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. पण हा मृत्यू कसा झाला, याबाबत अजून तपास लागलेला नाही. श्रीकांत खांडलकर यांनी अनेक जनहित याचिका कोर्टात दाखल केलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचा खून झाला की त्यांनी आत्महत्या केली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close