पाकिस्तानचं हेरगिरी रॅकेट उद्‌ध्वस्त, एका बीएसएफ जवानाचाही समावेश

November 30, 2015 8:07 AM0 commentsViews:

CVBrlQ6VEAAXahx

30 नोव्हेंबर : पाकिस्तानचं हेरगिरी रॅकेट उद्‌ध्वस्त करण्यात दिल्ली पोलिसांना यश आलं आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या गुप्तचर यंत्रणेशी (ISI) संबंधित दोन एजंटना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एका बीएसएफ जवानाचाही समावेश आहे. पोलिसांनी या एजंटबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीये.

दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसीपी के. पी. एस. मल्होत्रा यांच्या नेतृत्तावत क्राईम ब्रँचच्या टीमने कैफतुल्ला खान आणि अब्दुल रशीद या दोन पाकिस्तानी एजंटना अटक केली आहे. यामधील अब्दुल रशीद हा रजौरीमध्ये बीएसएफच्या इंटेलिजिएन्स विंगचा हेड कॉन्स्टेबलपदावर आहे. तर त्याच्याबरोबर देशाच्या सुरक्षेच्या माहितीची देवाण-घवाण करत असलेल्या कफैतुल्ला खान उर्फ मास्टर राजा या हस्तकालाही अटक करण्यात आली.

कैफतुल्ला हा पाकिस्तानच्या पीआयओचा हँडलर असल्याचं सांगितलं जातं आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला त्यांच्या कारवाईचा सुगावा लागल्यानं सापळा रचून जम्मू रेल्वे स्टेशनवर या दोन हस्तकांना अटक करण्यात आली. दोघांचीही अटक ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट अंतर्गत करण्यात आली आहे. दोघांकडूनही राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित काही महत्त्वाचे दस्ताऐवज जप्त केल्याची माहिती मिळते आहे.

तर कोलकात्याहुनही एक पीता- पुत्र आणि आणि त्यांच्याच एका नातेवाईकाला अटक करण्यात आलीये. पाकिस्तान गुप्तचर संघटना (ISI)चे एजंट असल्याच्या आरोपात या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. कोलकाता पोलीसच्या स्पेशल टास्क फोर्सने त्यांना अटक केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close