गुगल सोशल नेटवर्किंगमध्ये

February 11, 2010 3:48 PM0 commentsViews: 5

11 फेब्रुवारीफेसबुक आणि ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइट्स आपल्याला माहित आहेत. आता गुगलही या स्पर्धेत उतरले आहे. गुगलने बझ नावाची नवी सोशल नेटवर्किंग साइट लॉन्च केली आहे. ही साइट गुगलच्याच जी मेल सर्व्हीसच्या आधारे काम करेल. याचा वापर करुन युजर्स स्टेटस अपडेट करु शकतील. सोबतच मित्रांबरोबर फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगचे ऑप्शनही यामध्ये आहेत. युजरचे जीमेल ऍड्रेस बुक वापरुन बझवर युजरची फ्रेन्ड्सची ऍटोमॅटीक लिस्ट बनेल. शिवाय फेसबुक आणि ट्विटर सारख्याच वेगवेगळ्या सेटिंग्ज वापरुन युजरला त्यांच्या पोस्ट्सचे प्रायव्हेट किंवा पब्लिक स्टेटसही ठरवता येणार आहे.

close