बिग बींची स्कूटरवारी…

November 30, 2015 9:32 AM0 commentsViews:

आपल्या लाडक्या बिग बींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसाठी काही खास फोटोज् शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिग बी एका नव्या रुपात दिसत आहेत. रिभु दासगुप्तांच्या ‘तीन’ या नव्या सिनेमांत बिग बी स्कूटर चालवताना दिसणार आहेत. चित्रपटातील एका सीनच्या चित्रीकरणासाठी बिग बींनी काही सेकंद का होईना कोलकाताच्या रस्त्यावर शनिवारी ही स्कूटर चालवली. याआधीही बिग बींनी ‘पिकू’ या चित्रपटासाठी सायकलवारी केली होती, आणि त्यानंतर आता बिग बींची ही स्कूटरवारी ‘तीन’या नव्या चित्रपटातून दिसणार आहे. चित्रपटात बिग बींसोबत नवाजूद्दीन सिद्दिकी आणि विद्या बालनसारखी तगडी स्टार कास्ट असणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close