मनोहर पर्रिकर यांचे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत

November 30, 2015 11:29 AM0 commentsViews:

sdadasapy

30 नोव्हेंबर : संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. वयाच्या साठीनंतर लोकांनी आपल्या निवृत्तीचा विचार करायला हवा. मी येत्या 13 डिसेंबरला साठ वर्षांचा होतोय. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासूनच यासंदर्भात विचार करणं सुरू केलं होतं, असं पणजीत एका कार्यक्रमादरम्यान मनोहर पर्रिकरांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. मोठी जबाबदारी स्विकारण्यात माझ्या मनात सध्या तरी विचार किंवा रस नसल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

छोट्या राज्यांतून दर्जेदार नेते तयार होण्याची शक्यता कमी असते ही वस्तुस्थिती आहे. पण, राज्य चुकीच्या मार्गावर जात असेल तर योग्य मार्ग दाखवण्याची माझी जबाबदारी आहे आणि ती मी वेळोवेळी पार पाडेन, असंही पर्रिकर म्हणाले. सध्या गोव्याच्या राजकारणात आश्वासक असे एकही नेतृत्त्व दिसत नसल्याची खंतही त्यांनी व्यत्क केली आहे.

मनोहर पर्रिकर हे गोव्यातील सर्वात मोठे नेते म्हणून ओळखले जातात. 2012मध्ये त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची धुरा त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली. स्वच्छ प्रतिमेचे राजकीय नेते म्हणून पर्रिकरांची ओळख आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close