दक्षिण मुंबईवर असणार सीसीटीव्हीची नजर

November 30, 2015 12:09 PM0 commentsViews:

CCTV FOOTAGE

30 नोव्हेंबर : 26/11 च्या दहशतवादी हल्यानंतर मुंबईमध्ये सीसीटीव्ही लावण्याची राज्यसरकारने घोषणा केली होती. तब्बल 8 वर्षांनंतर राज्यसरकारच्या या सीसीटीव्ही प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. कुलाबा ते वरळी भागात आजपासून 1250 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या यंत्रणेचं लोकार्पण करणार आहेत.

मुंबईची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी संपूर्ण शहरात उच्च क्षमता असलेले सुमारे 6 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा पहिला टप्प्या म्हणून दक्षिण मुंबईतील कुलाबा ते वरळीदरम्यानच्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे 1250 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close