काँग्रेसच्या काळात सर्वात जास्त असहिष्णुता – संजय राऊत

November 30, 2015 1:33 PM0 commentsViews:

sanjay raut

30 नोव्हेंबर : काँग्रेसच्या राजवटीत राजकीय, सामाजिक स्तरावर जितकी असहिष्णुता वाढली होती तितकी जगभरात कधीच वाढली नव्हती असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत केला आहे. आज (सोमवारी) लोकसभेत असहिष्णुता विषयावर चर्चा सुरू आहे. या मुद्द्यावर बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.

सध्या देशभरात असहिष्णुता विषयावर फार मोठ वादळ निर्माण झालं आहे. या मुद्यावरुन भाजप सरकारला टार्गेट केलं जात असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला टार्गेट करत थेट आरोप केला आहे. तसंच काँग्रेसनं आम्हाला तोंड उघडायला लावू नये. काही गोष्टी जर आम्ही देशामसोर आणल्या तर काँग्रेसला देश सोडावा लागेल, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close