‘निर्धास्तपणे सिनेमा पाहा…’

February 12, 2010 9:03 AM0 commentsViews: 3

12 फेब्रुवारीमाय नेम इज खान हा सिनेमा रिलीज करण्यासाठी आज राज्यसरकारने थिएटर्सना अभूतपूर्व सुरक्षा दिली आहे. पोलिसांच्या गराड्यातच सिनेमा रिलीज झाला आहे. थिएटर्समालकांनी न भीता सिनेमा रिलीज करावा. आणि प्रेक्षकांनीही निर्धास्तपणे सिनेमा पाहायला या, असे आवाहन पोलीस करत आहेत. 63 थिएटर्स आणि मल्टीप्लेक्सला पोलिसांनी संरक्षण दिले आहे. जवळपास 11 हजार पोलीस संवेदनशील भागामध्ये गस्त घालत आहेत. शिवसेनेच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, राज्य राखीव दलाचे 600 जवानही तैनात करण्यात आले आहेत. वर्दीतील पोलीस थिएटरबाहेर तर साध्या कपड्यातील पोलीस थिएटरच्या आत लक्ष ठेवणार आहेत. आतापर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 2 हजार 300 शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.सुरक्षेची काळजी- थिएटरच्या प्रवेशद्वारावरच प्रेक्षकांजवळचे सामान चेक केले जाणार आहे. – काही थिएटर्समध्ये तर सोबत सामानही न्यायला परवानगी नाही- बुकिंग विंडो, प्रोजेक्शन रुम आणि थिएटरच्या स्क्रीनपाशी सुरक्षा वाढवण्यात आली आहे – काही थिएटर्सबाहेर, तसेच कॉम्प्लेक्सच्या आतही कॅमेर्‍यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे- थिएटरमधल्या पहिल्या 3 रांगा सुरक्षा जवानांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत

close