निवृत्तीचं विधान गमतीने, पर्रिकरांचा यू-टर्न

November 30, 2015 4:21 PM0 commentsViews:

parikar_on_retird30 नोव्हेंबर : निवृत्तीच्या विधानावरून आता संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी यू टर्न घेतलाय. निवृत्तीचं विधान सहजपणे केलं होतं, त्यात काही गांभीर्य नव्हतं असा खुलासा पर्रिकर यांनी ट्विट करून केलाय.

वयाच्या साठीनंतर लोकांनी आपल्या निवृत्तीचा विचार करायला हवा. मी येत्या 13 डिसेंबरला साठ वर्षांचा होतोय. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासूनच यासंदर्भात विचार करणं सुरू केलं होतं, असं वक्तव्य पणजीत एका कार्यक्रमादरम्यान मनोहर पर्रिकरांनी केलं होतं. एवढंच नाहीतर मोठी जबाबदारी स्विकारण्याची आपली तयारी नाही असंही पर्रिकर म्हणाले होते. आपल्या वक्तव्यामुळे गोंधळ निर्माण झाल्यानंतर पर्रिकर यांनी आपण तसं काही म्हटलंच नाही असा खुलासा केला. पर्रिकर म्हणतात, “60 वर्षांच्या वयात साधारणपणे लोक निवृत्तीचा विचार करतात आणि कदाचित मीही केला असता. पण केंद्रामध्ये मी माझ्या खांद्यावर काही मोठ्या जबाबदार्‍या घेतल्या आहेत आणि मला दिलेलं काम पूर्ण केल्यावर मगच मी असा विचार करू शकतो याची तुम्हाला खात्री देतो.” पर्रिकर यांच्या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चा रंगली होती. पण पर्रीकरांनी स्पष्टीकरण देत या प्रकरणावर पडदा टाकलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close