हिंगोली ते लोकसभा, राजीव सातव यांचं प्रगतिपुस्तक

November 30, 2015 4:41 PM0 commentsViews:

कौस्तुभ फलटणकर, नवी दिल्ली

30 नोव्हेंबर : पंतप्रधान मोदींच्या लाटेतही हिंगोलीचा गड राखणार्‍या राजीव सातव यांच्याकडे भविष्यातला काँग्रेसचा मोठा नेता म्हणून बघितलं जातं. राहुल गांधींचे खास असलेले सातव पहिल्यांदाच लोकसभेत निवडून आले आहेत. राजीव सातव यांचं प्रगतिपुस्तक

चाळीस वर्षांच्या सातव यांची लोकसभेत एंट्री दमदार झाली. लोकसभेच्या कामकाजात 83 टक्के उपस्थिती नोंदवून आपण गंभीर
असल्याचे संकेत सातव यांनी दिले आहेत. आणि सोबतच, चर्चा, प्रश्न उत्तरे, आणि प्रायव्हेट मेंबर बिलमध्ये सुद्धा सातव सगळ्यात पुढे राहण्याचा प्रयत्न करतात आहेत.

rajiv satava- सातव यांची लोकसभेतील उपस्थिती 83 टक्के
– मागच्या हिवाळी अधिवेशनात सातव यांची उपस्थिती 91 टक्के
– लोकसभेच्या सगळ्या खासदारांच्या उपस्थितिचा एव्हरेज आहे 84 टक्के तर महाराष्ट्रातल्या उर्वरीत खासदारांचा एव्हरेज आहे 81 टक्के

- चर्चेतील सहभाग
सातव यांनी 35 चर्चेत सहभाग घेतला, ज्यात सगळ्या खासदारांचा एव्हरेज 20 आणि महाराष्ट्रातल्या खासदारांचा एव्हरेज 19 आहे.

- जनतेचे प्रश्न
सातव यांनी आत्ता पर्यंत लोकसभेत 327 प्रश्न विचारले आहेत, लोकसभेतला इतर खासदारांचा एव्हरेज 89 आहे तर महाराष्ट्राचा 189

- प्रायवेट मेंबर बिल
सातव यांनी दोन प्रायव्हेट मेंबर बिल मांडले आहे. यात सगळ्या खासदारांचा एव्हरेज 0.6 तर महाराष्ट्राचा एव्हरेज आहे 1.1

सातव यांनी केलेल्या चर्चेत, महाराष्ट्रात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई, आणि लहान मुलांचे अपहरण करुन विक्री करण्याचे मुद्दे प्रभावी होते.

सातव यांची प्रगती उत्तम असली तरी सर्वोत्तम करायची संधी त्यांच्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close