अनिल कुंबळेचा मुंबई इंडियन्सच्या चीफ मेंटॉरपदाचा राजीनामा

November 30, 2015 8:48 PM0 commentsViews:

mumbai indians30 नोव्हेंबर : भारताचा माजी लेगस्पिनर अनिल कुंबळेनं मुंबई इंडियन्सच्या चीफ मेंटॉरपदाचा राजीनामा दिलाय. 2013 पासून अनिल कुंबळे मुंबई इंडियन्ससोबत होता.

क्रीडा जगतातल्या इतर जबाबदार सांभाळ्यासाठी अनिल कुंबळेनं मुंबई इंडियन्सच्या जबाबदारीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.

अनिल कुंबळे चीफ मेंटॉर असतांना 2013मध्येच मुंबई इंडियन्सनं आयपीएलचं अजिंक्यपद पटकावलं होतं. अनिल कुंबळेच्या 3 वर्षांच्या कार्यकाळात मुंबई इंडियन्सनं 2 वेळा आयपीएलचं अजिंक्यपद आणि एकवेळा चॅम्पियन्स लीगचं अजिंक्यपद पटकावलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close