‘त्या’ फॅनची जाहीर माफी मागा, सुप्रीम कोर्टाने गोविंदाला बजावलं

November 30, 2015 9:13 PM0 commentsViews:

govinda fan slap 30 नोव्हेंबर : फॅनवर हात उचल्याप्रकरणी अभिनेता गोविंदाला सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने गोविंदाला फॅनवर हात उचचल्याच्या प्रकरणात जाहीर माफी मागण्याचे आदेश दिले आहे.

2008 साली ‘मनी है तो हनी है’ या सिनेमाच्या सेटवर अभिनेता गोविंदाने शुटिंग पहायला आलेल्या एका फॅनच्या श्रीमुखात भडकावली होती. त्यानंतर या व्यक्तीने गोविंदा विरूद्ध पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर आधी कनिष्ठ न्यायालय नंतर उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलं. अखेर स्क्रिनवरील वर्तणूक आणि खर्‍या आयुष्यातील वर्तणूक यात फरक असतो असं बजावत न्यायालयाने गोविंदाला या फॅनची जाहीर माफी मागायला सांगून हे प्रकरण मिटवायला सांगितलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close