सूरज परमार आत्महत्या प्रकरणात आव्हाडांचं नाव ?

December 1, 2015 9:10 AM0 commentsViews:

suraj parmar_jitendra awhad01 डिसेंबर : ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणी आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचंही नाव पुढे येतंय. या प्रकरणात आरोपी असलेले नगरसेवक नजिब मुल्ला यांच्या अकाउंटवरुन जितेंद्र आव्हाड यांच्या अकाउंटवर जवळपास एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याची बाब सरकारी वकील राजा ठाकरे यांनी हायकोर्टात सांगितलंय.

या व्यवहाराबरोबरच नजिब मुल्ला आणि आव्हाड यांच्यात खात्यांमध्ये आणखीही बरेच गैरव्यवहार असल्यानं मुल्लाच्या पोलीस कोठडीची गरज असल्याचंही राजा ठाकरे यांनी सांगितलं. सूरज परमार यांनी सरकारी कर्मचारी आणि काही नगरसेवक आपल्या त्रास देत असल्याचं सांगून आपल्या साईट ऑफिसमध्ये आत्महत्या केली होती. काही दिवसांनंतर सूरज परमार यांच्या डायरीमध्ये चार नाव लिहलेली होती. ही चारही नाव नगरसेवकांची होती. नावं समोर आल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. आता या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं नाव समोर आल्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. पण, जितेंद्र आव्हाड यांना अकाउंटमध्ये पुरवण्यात आलेले पैसे हे कोणत्या कामासाठी होते हे अजून स्पष्ट होऊ शकलं नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close