असहिष्णुतेच्या मुद्यावर आज राहुल गांधी लोकसभेत मांडणार भूमिका ?

December 1, 2015 11:50 AM0 commentsViews:

rahul gandhi_401 डिसेंबर : असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ होण्याची शक्यता आहे. लोकसभेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी या मुद्द्यावर बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

तर राज्यसभेत काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी या मुद्द्यावर चर्चेसाठी प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची नोटीस दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसहून परत येतायत. त्यांनी यावर बोलावं, यासाठी विरोधक आग्रह धरण्याची शक्यता आहे.

सोमवारी लोकसभेत सीपीएमचे खासदार मोहम्मद सलीम आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात असहिष्णुतेच्या मुद्यावरुन खडाजंगी झाली होती. त्यामुळे पहिल्या दिवस गदारोळात गेला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close