ऐकावं ते नवलच, पडला माशांचा पाऊस !

December 1, 2015 11:59 AM0 commentsViews:

जगभरात अनेक अशी रहस्य आहे ज्यांचा शोध अजून लागू शकला नाही. त्यापैकीच माशांचा पाऊस हा एक.. मागील वर्षी जून 2015 मध्ये आंध्रप्रदेशमधील विजयवाडामध्ये माशांचा पाऊस पडला होता. आकाशातून मासे पडल्यामुळे नागरिक तर चकीत झालेच पण दुसर्‍या क्षणी भेटले त्या वस्तूने मासे गोळा करण्यास धूम उडाली. लोकांनी अक्षरश : बकेट भरभरून मासे घरी नेले. एवढंच काय तर प्रसंगाचं भान राखून काही मासेप्रेमींनी कारमध्येच मासे भरून नेले. असा तर्क लढवला जातोय की, समुद्रात आलेल्या चक्रीवादळात मासे अडकली जातात. आणि जेव्हा या वादळाचा जोर ओसरतो तेव्हा मासे खाली कोसळता. पण हे नेमकं घडतं कसं आणि हे खरंच आहे का हे मात्र अजूनही कोडं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close