ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट

February 12, 2010 1:50 PM0 commentsViews: 3

12 फेब्रुवारीभव्य दिव्य ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट मॅच?..विश्वास बसणार नाही. पण आता हे शक्य होणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आयसीसीला अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे ऑलिम्पिक समितीच्या भविष्यातील कार्यक्रमांमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची वाट मोकळी झाली आहे. त्यामुळे टी-20 क्रिकेटचा त्यात समावेश होऊ शकणार आहे. 2007 मध्ये क्रिकेटला ऑलिम्पिक खेळ म्हणून मान्यता मिळाली होती. पण फक्त खेळ म्हणून मान्यता मिळालेल्या क्रिकेटचा ऑलिम्पिक कार्यक्रमांतर्गत समावेश केला गेला नव्हता. त्यासाठी काही तत्त्वे घालण्यात आली होती. पण दोन वर्षे याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ऍडम गिलख्रिस्ट, सौरव गांगुली यांनी ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटचा समावेश करण्यात यावा यासाठी पाठपुरावा केला गेला. एकोणीसशेच्या पॅरीस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर क्रिकेटचा कधीही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला नाही. पण आता चीनमध्ये गुआंगझु इथे होणार्‍या एशियन गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. गोल्फ आणि रग्बी या खेळांचाही हल्लीच ऑलिम्पिक खेळात समावेश करण्यात आला आहे.

close