डिसेंबर उजाडला, दुष्काळी मदत कधी देणार ? -अशोक चव्हाण

December 1, 2015 1:29 PM0 commentsViews:

asokh chavan401 डिसेंबर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. डिसेंबर उजाडला तरीही 3000 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली अशा महाराष्ट्राला संकटातून काढण्यासाठी केंद्र सरकार कधी निधी देणार असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलाय.

केंद्रातील पथकाने गेल्या काही महिन्यात पाच ते सहा वेळा महाराष्ट्रातील दुष्काळ भागाचा दौरा केलाय. केंद्र पथकाने तिथल्या परिस्थिचा आढावा घेतलाय. राज्यातील दृष्काळातून शेतकर्‍यांना सोडविण्यासाठी 4 कोटींची मागणी केली आहे ती मदत कधी दिली जाणार अशी विचारणाही चव्हाण यांनी केली. तर चव्हाण यांच्या प्रश्नाला केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी उत्तर दिलं.

गेल्या वेळी महाराष्ट्राला सगळ्यात जास्त निधी देण्यात आला होता. ही इतिहासातील सगळ्यात मोठी मदत आहे असा दावा सिंग यांनी केला. तसंच आम्ही सगळ्या राज्यांना दुष्काळासंदर्भात अहवाल मागितला होता. सगळ्यात पहिले कर्नाटकाने आपला अहवाल दिली, कालच महाराष्ट्रातील दुष्काळ विभागाचा दौरा करून केंद्र पथक आले आहे. पुढील दोन तीन दिवसात यासंदर्भात बैठक घेण्यात येईल आणि महाराष्ट्राला भरीव मदत देण्यात येईल, असं आश्वासन राधामोहन सिंग यांनी दिलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close