शिवसेनेची मान्यता रद्द करा

February 12, 2010 2:17 PM0 commentsViews: 6

12 फेब्रुवारीशाहरुख खानच्या सिनेमावरून राडा करणार्‍या शिवसेनेची मान्यताच रद्द करा, अशी मागणी महसूलमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करताना घटनेची आणि लोकशाहीची तत्त्वे पाळण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले होते. पण पण समान नागरिकत्वाची तत्त्वेच शिवसेना पायदळी तुडवत आहे. भाषा, धर्म, जाती-पाती यांचे मुद्दे उपस्थित करत शिवसेनेने राष्ट्रीय एकात्मतेलाच धक्का दिला आहे. त्यामुळे घटनेचा अवमान करणार्‍या सेनेची राजकीय पक्ष म्हणून मान्यता काढून घ्यावी, अशी मागणी राणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

close