शाहरुख हिट, सेना फ्लॉप

February 12, 2010 3:22 PM0 commentsViews: 1

12 फेब्रुवारीशिवसेनेची दादागिरी धुडकावून आज रिलीज झालेल्या माय नेम इज खान सिनेमाला प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला. त्यामुळे आज सगळीकडे शाहरुख हिट आणि शिवसेना फ्लॉप असेच चित्र पाहायला मिळाले. मुंबईत अगोदर 'फन रिपब्लिक'मध्ये हा सिनेमा रिलीज झाला. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी उस्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. शाहरुखची पत्नी गौरी हिनेही अंधेरीच्या 'फन रिपब्लिक'मध्ये सिनेमा पाहिला. सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचे तिने आभार मानले.मुंबईत 35 ठिकाणी हा सिनेमा रिलीज झाला. पण धमकी देणार्‍या शिवसैनिकांनी केवळ चारच ठिकाणी आंदोलन केले. गोंधळ घालणार्‍या 136 शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली आहे.राज्यात प्रतिसादनागपूरमध्ये या सिनेमाला पे्रक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अमरावतीतील चित्रा टॉकीजमध्ये हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. आजचे दोनही शो हाऊसफुल्ल झाले. पुणे आणि औरंगाबादमध्ये मात्र थिएटर मालकांनी 'माय नेम इज खान' रिलीज करण्यास नकार दिला.भरपाई वसूल करणारदरम्यान आंदोलनांमध्ये मालमत्तेचे नुकसान करणार्‍या पक्षांकडून नुकसान भरपाई वसूल क रणार आहोत, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय आम्ही सिनेमाला संपूर्ण सुरक्षा दिलेली आहे. प्रेक्षकांनी न घाबरता सिनेमा बघावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

close