विशेष रिपोर्ट : पुणे ‘सायबर क्राईम’च्या जाळ्यात

December 1, 2015 5:50 PM0 commentsViews:

वैभव सोनवणे, पुणे
01 डिसेंबर : 2000 सालापासून भारतात इंटरनेटचा चा वेगाने प्रसार झाला. आधी कॉम्प्युटर आणि आता हातात असलेला स्मार्ट फोन यामुळे जग एका क्लिक च्या दृष्टीक्षेपात येउन ठेपलंय. या इंटरनेटच्या जंजाळात सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या ना त्या प्रकारे तुमची माहिती द्यावी लागते मग अर्थातच, आणि या माहितीचा ओघ नेमका कुणाच्या हातात जातो… ते त्याचा कसा वापर करतात, मग कशी होते सर्वसामान्यांची फसवणूक… बघूयात पुण्याहून सायबर क्राईमवर हा विशेष रिपोर्ट.

Cybercrime

नोकरी हवीये, लग्न जमवायचंय, बँकेचे व्यवहार करायचे आहेत, लॉग इन करा, तुमची माहिती भरा आणि काम सोप्पं करा. बसल्या जागेवरुन जगभरात कुठेही संवाद साधण्याची, संपर्क ठेवण्याची, बसल्या जागेवरुन काम हातावेगळं करण्याची संधी देणारं प्रचंड ताकदवान माध्यम इंटरनेट. इंटरनेटचा वापर ज्या वेगाने वाढला तितक्याच वेगाने इंटरनेटवर होणा-या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे, आणि अशा सायबर गुन्ह्यंाचा छडा लागून आरोपी गजाआड होण्याची संख्या खूपच नगण्य आहे.

सायबर गुन्हेगारीत मुख्यत्वे महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना लक्ष्य करण्यात येतंय.

सायबर गुन्हेगारीचा वाढता धोका

- सोशल साईट्सच्या माध्यमातून तरुणींना ब्लॅकमेल करणं
– नोकरीविषयक साईट्सवरुन नोकरीच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक करणं
– विवाहविषयक साईट्सवर नोंदणी करणार्‍या महिलांची आर्थिक फसवणूक
– ज्येष्ठ नागरिकांकडून ई-मेलवर माहिती मागवून त्यांची आर्थिक फसवणूक करणे
– बँकेतून फोन केल्याची बतावणी करत खात्याची सर्व माहिती घेऊन त्याआधारे फसवणूक

पुणे : सायबर गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण

- 2013 : 73 सायबर गुन्ह्यांची नोंद
– 2014 : 82 सायबर गुन्ह्यांची नोंद
– 2015 (सप्टेंबरपर्यंत) : 57 सायबर गुन्ह्यांची नोंद

पुणे : सायबर फसवणुकीचे प्रकार

- 77 तक्रारी : सोशल साईट्सशी संबंधित
– 32 तक्रारी : ई-मेलवरुन झालेली फसवणूक
– 15 गुन्हे : वेबसाईटवरुन विवाह नोंदणीनंतर झालेली फसवणूक

इंटरनेटचा वापर करताना जर योग्य ती खबरदारी घेतली तर होणारी फसवणूक टाळता येते, त्यामुळे इंटरनेट वापरताना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

पुणे पोलिसांकडून सध्या सायबर क्राईम टाळण्यासाठी मोठी जनजागृती करण्याचे प्रयत्न होत आहेत, कॉलेज, ज्येष्ठ नागरिक संघ अशा ठिकाणी इंटरनेट वापरताना काय काळजी घ्यावी याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे.

इंटरनेटच्या महाजालात स्वत:ची सोय बघताना स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षाही सुध्दा ध्यानात ठेवायला हवी. इंटरनेटमुळे काम सोपं झालं असलं तरी जागरुक राहिलो नाही तर जगणं कठीण होऊन बसेल याचं भानही ठेवणं गरजेचं आहे. थोडक्यात काय, तर वाढणारे सायबर गुन्हे रोखणं हे बर्‍याचअंशी आपल्या म्हणजेच इंटरनेट वापरणार्‍यांच्या हाती आहे हे सतत लक्षात ठेवायला हवं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close