श्रीराम सेनेची दांडगाई

February 12, 2010 3:33 PM0 commentsViews: 1

12 फेब्रुवारीमाय नेम इज खान सिनेमाच्या वादानंतर आता 'व्हॅलेंटाईन डे'ला विरोध करणार्‍यांचा आवाज वाढू लागला आहे. श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांना काळे फासल्याच्या घटनेचे पडसाद बेळगावात उमटले आहेत. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज बसवर दगडफेक केली. तर काही अज्ञात लोकांनी एका रिक्षाचालकावर हल्ला केला. हल्ल्यात या रिक्षाचालकाचा मृत्यू ओढवल्याने तणाव आणखी वाढला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शहरात 144 कलम लागू केले आहे. श्रीरामसेनेच्या काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. काल बंगळुरुमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुतालिक यांच्या तोंडाला काळे फासले होते. व्हॅलेंटाईन डेच्या कार्यक्रमाला श्रीराम सेना विरोध करणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे काळे फासले होते. कॉलेजेस आणि थिएटर्समध्ये व्हॅलेंटाईन डे साजरे करु देणार नाही, असा इशारा मुतालिक यांनी दिला होता.

close