लाईफलाईन की डेथलाईन ?, 24 तासांत 3 जणांचा बळी

December 2, 2015 1:15 PM0 commentsViews:

mumbai local accident02 डिसेंबर : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबईची लोकल आता डेथलाईन आहे की काय अशी भीती निर्माण झालीये. भावशे नखाते या तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू ओढवल्याची घटना ताजी असताना गेल्या 24 तासांत आणखी तीन जणांचा बळी गेलाय. तर आठवड्याभरात मुंबईच्या लोकल अपघातात चार जणांचा बळी गेलाय.

भावेश नकाते या तरूणाचा डोंबिवली ते कोपरीदरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला. दिवा ते कळवा ठाणे दरम्यान नरेश पाटील यांचा काल मृत्यू झाला. कोपर ते दिवादरम्यान 40 वर्षांच्या डोंबिवलीचा नितीन चव्हाण याचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झालाय. तर कल्याण-ठाकुर्लीदरम्यान 60 वर्षांच्या शंकर नारायण यांचा मृत्यू झाला. दरम्यान, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मुंबई-ठाण्यातल्या शिवसेना-भाजपच्या खासदारांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. आणि त्यांच्यापुढे मुंबईकरांना भेडसावणार्‍या समस्यांचं गार्‍हाणं मांडलं. लोकलचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी मेट्रोसारखे स्वयंचलित बंद दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव खासदारांनी ठेवला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close